शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टखाली चिरडून गोवंडीत दोन तरुणांचा मृत्यू

By admin | Updated: December 27, 2014 04:57 IST

भरधाव बाईक आणि बेस्ट बस धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली

मुंबई : भरधाव बाईक आणि बेस्ट बस धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी बेस्टचालक ज्ञानोबा राजप्पा गायकवाड (५५) यांना अटक केली. अब्दुल शाहिद (१४), नासिर अन्सारी (१५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर तरबेज खान (१५) हा जखमी झाला आहे. तिघेही शिवाजीनगरचे रहिवासी आहेत. तरबेज व नासिरला मागे बसवून गाडी सूसाट दामटवणाऱ्या शाहिदने ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडी बसच्या डाव्या बाजूला घेतली. त्याचवेळी एक महिला रस्ता ओलांडत होती. तिला वाचवण्याच्या धडपडीत बाईक घसरली आणि तिघेही बसच्या खाली चिरडले गेले. शिवाजीनगर पोलिसांनी अब्दुल याला शताब्दी तर नासिर आणि तरबेज यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. अब्दुलचा उपचारापूर्वीच तर नासिरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.