शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस शिपाई विलास शिंदेंच्या आईचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 13:32 IST

विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पोलीस शिपाई विलास शिंदेंच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ -  विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या कुटुंबियांवर आणखी एक दु:खाचा पहाड कोसळला आहे. विलास शिंदे यांच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विलास शिंदे यांच्या तेराव्याचा विधी सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. 
(वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण)
(विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव)
 
 
२३ ऑगस्ट रोजी विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन मुलाला विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले होते. सदर मुलाकडे लायसन्सही नव्हते. दरम्यान, त्या मुलाची चौकशी सुरु असताना त्या मुलाने आपल्या भावाला बोलावून घेतले. यावेळी त्याच्या भावाने मागून येऊन थेट विलास शिंदे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले. या घटनेनंतर विलास शिंदे यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. 
त्याच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबिय दु:खी असतानाच आज त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. 
(विलास शिंदेंची होती नेत्रदान करण्याची इच्छा)
  •