शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पोलिसांमुळे सरकारला दट्ट्या

By admin | Updated: January 26, 2017 05:36 IST

लोकल ट्रेनमध्ये अपंगांसाठी व कर्कग्रस्तांसाठी राखीव असलेल्या डब्यातून पोलिसांनी प्रवास केल्यास, त्यावर शिस्तभंगाची कारवाई करू

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये अपंगांसाठी व कर्कग्रस्तांसाठी राखीव असलेल्या डब्यातून पोलिसांनी प्रवास केल्यास, त्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, अशा आशयाचे परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना बुधवारी दिले. नितीन देशपांडे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरील निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.लोकलमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून सामान्य लोक आणि पोलीसही प्रवास करत असल्याची बाब देशपांडे यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. ‘याचिकेद्वारे धक्कादायक बाब उघडकीस आणण्यात आली आहे. राखीव डब्यातून पोलीसही प्रवास करतात, हे सिद्ध करण्यासाठी याचिकाकर्त्याकडे सबळ पुरावे आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारेच कायदा मोडत आहेत. या संदर्भात राज्य सरकार व पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी काही कारवाई केली नाही, हे पाहून आम्हाला धक्का बसला,’ असे खंडपीठाने म्हटले.‘याबाबत सरकारला गांभीर्याने विचार करावा आणि संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करावीच लागेल. अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास न करण्यासंदर्भात गृहविभागाने आणि पोलीस महासंचालकांनी परिपत्रक काढावे,’ असे निर्देश खंडपीठाने याचिकेवरील सुनावणीत दिले.उच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकार व पोलीस महासंचालकांना २ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.दरम्यान, उच्च न्यायालयाने पर्सन विथ डिसॅबिलिटीच्या आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांचा आधार घेत, उच्च न्यायालयाने पश्चिम व मध्य रेल्वेला आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात येईल, याची काळजी घेण्यास सांगितले, तसेच जनजागृती करण्याचे व जे या राखीव डब्यातून प्रवास करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला दिले. (प्रतिनिधी)