शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘दादा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांचा ‘दादा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेते दादा कोंडके यांच्या नावावर किंवा जीवनावर चित्रपट

पुणे : अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांचा ‘दादा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेते दादा कोंडके यांच्या नावावर किंवा जीवनावर चित्रपट काढण्याचा अधिकार हा फक्त शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानलाच आहे, अशी हरकत घेत प्रतिष्ठानने निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही बजावली आहे.अनिता पाध्ये लिखीत ‘एकटा जीव’ हे पुस्तक दादांच्या मृत्यू नंतर १९९९मध्ये प्रकाशित झाले. मात्र, या पुस्तकाला दादाची कोणतीही सहमती नसल्याने व अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर असल्याने या पुस्तकावर न्यायालयात सध्या खटला सुरू आहे. आता याच पुस्तकावर ‘दादा’ हा चित्रपट येणार असल्याचे कळले आहे. वास्तविक या पुस्तकाचे हक्क प्रतिष्ठानकडेच आहेत. शिवाय दादांच्या जीवनावर नाटक अथवा चित्रपट निर्मिती करायची असेल तर प्रतिष्ठानची परवानगी घेणे कायदेशिररित्या बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे, अस प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हृदयनाथ कडूदेशमुख म्हणाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत भालेकर यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने अध्यक्षपदी संग्राम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात शिर्के मध्यस्थ असल्याचेही कडूदेशमुख यांनी सांगितले.दादा कोंडके यांच्यावर चित्रपट काढायला आमचा विरोध नाही. मात्र अशी कलाकृती बनविण्यापूर्वी निर्मात्याने रितसर प्रतिष्ठानची परवानगी घ्यावी. त्याविषयीची स्क्रीप्ट प्रतिष्ठानच्या सभासदांकडून संमत झाल्यावर निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर प्रतिष्ठानला योग्य ती रॉयल्टी देण्यात यावी.- हृदयनाथ कडूदेशमुख, उपाध्यक्ष, शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान