शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्य पडताळणीसाठी गर्दी

By admin | Updated: January 25, 2017 22:23 IST

इच्छुकांनी तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाबरोबरच चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे़ त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात अडीचशे इच्छुकांचे अर्ज विशेष शाखेत जमा झाले आहे़

 

पुणे : निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आपल्यावर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती उमेदवारी अर्जात भरायची असल्याने इच्छुकांनी तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाबरोबरच चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे़ त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात अडीचशे इच्छुकांचे अर्ज विशेष शाखेत जमा झाले आहे़ 
शहर पोलीस दलाकडून संबंधित व्यक्तीवर त्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल आहे की नाही, याचे रेकॉर्ड तपासून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते़ सरकारी नोकरी, बँका, खासगी संस्थांमधील नोकरी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षा बॅच मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची गरज असते़ विशेष शाखेकडे चारित्र्य पडताळणीसाठी २०१६ मध्ये ५४ हजार अर्ज आले होते़ दर महिन्याला साधारण साडेचार हजार अर्ज येत असतात़ 
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी चारित्र्य पडताळणी करून घेणाºयांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे़ सोमवारी एकाच दिवशी अडीचशे जणांनी निवडणुकीसाठी चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला आहे़ 
नेहमी येणाºया अर्जांच्या दुप्पट अर्ज गेल्या दोन दिवसांपासून येण्यास सुरुवात झाली आहे़
निवडणुकीसाठी चारित्र्य पडताळणी करून देण्यासाठी मर्यादित वेळ असल्याने विशेष शाखेच्या वतीने जास्तीत जास्त लवकर असे प्रमाणपत्र देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे़ त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे़ विशेष शाखेत अर्ज आल्यानंतर दुसºया दिवशी हा अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे रवाना होतो़ तेथील चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा विशेष शाखेकडे रवाना केला जातो़ तेथे सर्व शहरांतील गुन्ह्यांच्या नोंदीबाबत संगणकीय तपासणी करून त्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र दिले जाते़ त्यात अनेकदा नावात साम्य असू शकते़ प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्याची खात्री केली जाते़
 
निवडणुकीसाठी आलेल्या अर्जावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी विशेष शाखेतील कर्मचाºयांना सध्या दररोज २ ते ३ तास जादा वेळ थांबावे लागत आहे़ पोलीस ठाण्यातून अर्ज आल्यानंतर दुसºया दिवशी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने विशेष शाखेने व्यवस्था केली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़