शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादकांपुढे ‘कोलेटोट्रीकम’ चे संकट

By admin | Updated: August 20, 2014 01:08 IST

अगोदरच अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता ‘कोलेटोट्रीकम’ च्या स्वरूपात नवे संकट उभे ठाकले आहे. गत काही दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील

दुहेरी फटका : एनआरसीसीच्या तज्ज्ञांनी घेतला आढावा नागपूर : अगोदरच अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता ‘कोलेटोट्रीकम’ च्या स्वरूपात नवे संकट उभे ठाकले आहे. गत काही दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन संत्रा पिकावर ‘कोलेटोट्रीकम’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात झाडावरील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे. यावर राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे (एनआरसीसी) संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी तज्ज्ञांच्या चमूसह अलीकडेच नागपूर व अमरावती जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल, वरुड, जरुड, चांदूरबाजार, मोर्शी व परतवाडा येथील संत्रा बागांना भेटी देऊन, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. डॉ. लदानिया यांच्या मते, सध्या या सर्व भागात आंबिया बहाराची फळे लागलेली आहेत. मात्र गत २० ते २५ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.शिवाय पावसाच्या आशेवर बसून असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विहिरीवरील ओलिताची साधने काढून ठेवली आहेत. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ न, जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून ‘कोलेटोट्रीकम’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे, उशिरा आलेल्या पावसामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. यात आता ‘कोलेटोट्रीकम’ या रोगाच्या स्वरूपात नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)काय आहे, ‘कोलेटोट्रीकम’एनआरसीसीतील तज्ज्ञांच्या मते, ‘कोलेटोट्रीकम’ हा बुरशीजन्य रोग आहे. याचा प्रादुर्भाव झालेल्या संत्रा झाडावरील फळाचे देठ व फांदी वाळते. यामुळे फळे पिवळी पडून, त्यांची गळ होऊ लागते. या रोगापासून संत्र्याचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा बागेला ताबडतोब पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच फळांची अधिक गळती होत असल्यास कार्बन्डेझीम, थायोफनेट मिथाईल किंवा बेनोमील या बुरशीनाशकांची कॅल्शियम नायट्रेडसह फवारणी करून, गरज भासल्यास पुढील १० ते १५ दिवसानंतर पुन्हा दुसरी फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.