शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे, आरोपींची माहिती आॅनलाइन

By admin | Updated: October 26, 2015 02:20 IST

नागरिकांना आता आपल्या जिल्ह्यासह राज्यात विविध प्रकारचे दाखल गुन्हे व अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, बेवारस मृत्यू आदी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

जमीर काझी, मुंबईनागरिकांना आता आपल्या जिल्ह्यासह राज्यात विविध प्रकारचे दाखल गुन्हे व अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, बेवारस मृत्यू आदी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयातर्फे वेबसाइटवर ही माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांना १० नोव्हेंबरची ‘डेडलाइन’ देण्यात आली आहे.राज्य पोलीस दलातील एकूण विविध ५२ घटकांपैकी १४ घटकांचे संकेतस्थळ आजपर्यंत बनविण्यातच आलेले नव्हते. आता पोलीस खात्याचा कारभार पारदर्शी व अद्ययावत राहावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.राज्यातील ११ कोटींवर जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचा बहुतांश वेळ बंदोबस्त व तपास कामात व्यतित होत असतो. त्यामुळे अनेकवेळा आवश्यक माहिती नागरिकांना मिळत नाही. अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त व अन्य ड्युटीमध्ये व्यस्त असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांना भेटीसाठी उपलब्धही होत नाहीत. जनतेला पोलीस दलातील अद्ययावत माहिती सहज उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सहज संपर्क साधता यावा, यासाठी प्रत्येक आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाची वेबसाईट अत्यावश्यक असल्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्व अधिकाऱ्यांना बजावले आहे. याबाबत तत्काळ पूर्ततेचे आदेश त्यांनी दिले आहेत. वेबसाईटवर प्रेस रिलीज, हरविलेल्या व्यक्ती, बेवारस मृतदेह, दाखल गुन्हे व पकडलेल्या आरोपींची माहिती, त्याचप्रमाणे स्थानिक स्तरावर केल्या जाणाऱ्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवाईची माहिती दररोज बेवद्वारे उपलब्ध करून द्यावयाची आहे. आयुक्त / अधीक्षकांनी या कामाची पूर्तता करून घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार आणि ‘डीआयटी’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. त्यासाठी आवश्यक बाबींसाठी पोलीस मुख्यालयातील संगणक कक्ष अधिकाऱ्यांकडून मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.