शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

थर्टीफर्स्ट पार्टीचे काउंटडाउन सुरू

By admin | Updated: December 28, 2014 00:38 IST

थर्टीफर्स्टचे काउंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सायबर सिटीतील हॉटेल्स, बिअर बार आणि रेस्टॉरेंट आकर्षक रोषणाईसह सज्ज झाले आहेत.

शहरातील हॉटेल्स सज्ज : ग्राहकांसाठी विविध सवलती, पोलीस यंत्रणा सतर्कनवी मुंबई : थर्टीफर्स्टचे काउंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सायबर सिटीतील हॉटेल्स, बिअर बार आणि रेस्टॉरेंट आकर्षक रोषणाईसह सज्ज झाले आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी खाद्यपदार्थ आणि मद्यांवर विविध सवलती देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत खारघर, पनवेलसह जवळपास सहाशे बिअर बार आणि रेस्टॉरेंट आहेत. तर दहा तारांकित हॉटेल्स आहेत. यात तीन थ्री स्टर आणि दोन फाईव्ह स्टार हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व हॉटेल्स व बिअर बारमधून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने हॉटेल आणि परिसर उजाळून निघाला आहे. ख्रिसमसपासूनच हॉटेल्समध्ये विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. काही तारांकित हॉटेल्समध्ये अनलिमिटेड फूड, ड्रिंक त्याचबरोबर डिजे आदी आॅफर देण्यात येत आहेत. फॅमिली व लहान मुलांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले असून यासाठी सोशल साईट्सच्या माध्यमातून जाहिरातील करण्यात येत आहेत. सध्या हॉटेल इंडस्ट्रीवर मंदीचे सावट आहे. विविध प्रकारच्या टॅक्समुळे ग्राहकांनी हॉटेलिंगकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक जण हॉटेल्समध्ये जाण्यापेक्षा आपापल्या सोसायटीतच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करतात. असे असले तरी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहरातील अनेक हॉटेल्स चालकांनी आपापल्या परीने ग्राहकांसाठी विविध सवलती जाहिर केल्याची माहिती एका हॉटेल चालकाने दिली.दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरात कुठेही अनुुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी गस्त वाढवली आहे. तसेच थर्टीफस्ट पार्टीच्या आयोजनासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून विनापरवाना रात्रभर चालणा-या पार्ट्यांवर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियाचा वापरग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक हॉटेल्स चालकांनी फेसबूक व व्हॉटसअपच्या माध्यमातून सवलतींची जाहिरातबाजी केली आहे. मनोरजंनाचे कार्यक्रम, खाद्यपदार्थ व मद्यावरील आकर्षक सूट, फॅमिली व मुलांसाठी विशेष पॅकेज आदींचे जोरदार मार्केटिंग करण्यात येत आहे....तर टॅक्सी सेवाही मिळणारकाही हॉटेल्स चालकांनी मद्याच्या पेगवर सवलती जाहीर केल्या आहेत. पार्टीच्या मूडमध्ये असलेल्या ग्राहकांना खाद्यपदार्थांची चवही सवलतीत चाखता येणार आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने आणि बिअर बार सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक बार चालकांनी प्रवासी टॅक्सीची सुविधा उपलब्ध केली आहे. थर्टीफस्टच्या पार्टीत अनेकजण मद्यधुंद होऊन अनेकजण सरत्या वर्षाला निरोप देतात अशा तळीरामांवर पोलीसांची करडी नजर राहणार असल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. पार्टीतील दारुच्या वापरासाठी देखिल उत्पादन शुक्ल विभागाची परवानगी आवश्यक असल्याचेही उमाप यांनी सांगितले. परंतु मैदानात किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांना मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकजण पार्टीनंतर मद्यधुंद होऊन वाहन चालवतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा तळीरामांना अटकाव करण्यासाठी पोलीसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून ब्रेथ अ‍ॅनेलायझर आणि स्पीड गणच्या सहाय्याने मद्यपीसह वाहनांच्या वेगावर नजर ठेवली जाणार आहे. त्याकरीता अधिकाधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर राहतील, असे त्यांनी सांगितले.