शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून भ्रष्टाचा:यांची पाठराखण - खडसे यांचा आरोप

By admin | Updated: June 1, 2014 01:15 IST

राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.

नाशिक : राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. तसेच चितळे समितीच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कारवाई करण्याचे टाळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला .
आदर्श घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल असताना जयराज फाटक यांच्यासह काही अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केल्यावरच त्यांना पुन्हा सेवेत घेणो योग्य ठरले आहे. मात्र त्यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग होता हे माहीत असूनही सरकारने त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय हा म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचाच प्रकार आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘आदर्श’ प्रकरणावरून सरकारला धारेवर धरणार आहे. त्याचप्रमाणो चितळे समितीच्या चौकशी अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या अधिवेशनात चितळे समितीचा कृती अहवाल सादर करण्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत. राज्य शिखर बॅँकेसंदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी या प्रकरणात कुणालाही माफ केले जाणार नाही, असे जरी सांगत असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर कारवाई करणार नाहीत. त्यांना कारवाई करायची असती तर त्यांनी कधीच केली असती, असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
आबा सर्वाधिक अपयशी
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे आतार्पयतचे सर्वाधिक अपयशी गृहमंत्री आहेत. गुन्हेगारी रोखण्यात त्यांना सपशेल अपयश आले आहे. खंडणी, खून, दलितांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढच होत आहे. पोलिसांशी गुन्हेगारांशी साटेलोटे असल्यानेच हे सर्व घडत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
 
मुंडेंच्याच नेतृत्वात निवडणुका
विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला. मात्र राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार भाजपाचा नसून तो शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्ष मिळून ठरवतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.