शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोणाचंही वेतन कापणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पगाराचं 'गणित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:55 IST

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा सुरू- मुख्यमंत्री

मुंबई: लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केला जाणार असल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. मात्र अशा प्रकारे कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. कित्येकांनी काळजी व्यक्ती केली. मात्र सरकार कोणाचंही वेतन कापणार नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आलेल्या आर्थिक अडचणी पाहता लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात पगार दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.कोरोनाचं संकट असतानाही शासकीय कर्मचारी सेवा देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे. वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. पोलीस आपल्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जनतेच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या मंडळींचा पगार कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईत अखेरच्या आणि निर्णायक टप्प्याकडे जात आहोत. त्यामुळे वस्त्या, इमारती सील कराव्या लागत आहेत. एखाद्या भागातला संसर्ग दुसरीकडे पोहोचू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला केंद्र सरकारनं काही देशांचा समावेश कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत केला नव्हता. त्यामुळे अशा देशांमधून आलेल्या व्यक्तींची विमानतळांवर तपासणी होऊ शकली नाही. परदेशातून आलेल्या, मात्र तपासणी न झालेल्या अशा व्यक्तींनी पुढे यावं, स्वत:ची माहिती द्यावी आणि तपासणी करून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. एखाद्या व्यक्तीला अ‍ॅलर्जी असल्यास, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उष्णता वाढल्यावर एसी लावू नये. त्याऐवजी खिडक्या उघडाव्यात. कोरोनाचा विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे कृपया एसी लावू नका. थंड पाणी, पेय पिऊ नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाच्या भीतीनं अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आहे. मात्र त्यांची सध्याच्या घडीला नितांत गरज आहे. शासकीय वैद्यकीय कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू करावेत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा केलं.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे