शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:54 IST

धारावीतील कोरोना नियंत्रणात श्रेय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सवाल

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरून संघर्ष सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. संघानं धारावी कोरोनामुक्त केली, असा दावा केला जात असेल, तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा झाला?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. 'धारावीत ज्यावेळी कोरोना संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त होतं, माणसं मरत होती, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशी एकही बातमी पाहण्यात आली नाही. पण धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली, असे कौतुकोद्गार जागतिक आरोग्य संघटनेनं काढताच अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले,' असं शेट्टी म्हणाले.राजू शेट्टी यांनी नागपूरमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून संघाला लक्ष्य केलं. 'माझ्या मनात एक शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही. कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इंचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे. अनेक शहरात आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावं. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याचं काम करावं. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल,” असा टोला शेट्टी यांनी लगावला.धारावीतील कोरोना नियंत्रणाबद्दल काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?'ज्या गोष्टी कौतुकास्पद आहेत, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण धारावीनं कोरोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, जीव धोक्यात स्क्रिनिंग करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,' असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Shettyराजू शेट्टीchandrakant patilचंद्रकांत पाटीलRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ