शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात 59 हजार 907 नवे रुग्ण, 322 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 22:57 IST

CoronaVirus News in Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या 82.36 टक्के एवढे आहे.

ठळक मुद्देआजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 11लाख 48 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31 लाख 73 हजार 261 (15.00 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजची कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 59,907 new COVID cases, 30,296 recoveries, and 322 deaths in the last 24 hours )

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात गेल्या 24 तासांत 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच, सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या 82.36 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 11लाख 48 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31 लाख 73 हजार 261 (15.00 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख ७८ हजार 530 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 21 हजार 212 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईतील आकडेवारी चिंताजनक!मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजची आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोरोनाचा वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र