CoronaVirus News: पुढील आठवड्यापासून कॉलेज उघडणार! एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 08:51 AM2022-01-22T08:51:07+5:302022-01-22T08:51:26+5:30

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील वर्ग पुढील आठवड्यात सुरू करावेत, असा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे.

CoronaVirus News College to open from next week! | CoronaVirus News: पुढील आठवड्यापासून कॉलेज उघडणार! एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

CoronaVirus News: पुढील आठवड्यापासून कॉलेज उघडणार! एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

Next

मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील वर्ग पुढील आठवड्यात सुरू करावेत, असा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री त्यावर एक-दोन दिवसात निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. कॉलेज सुरू करण्यासंदर्भात विभागाने तीन तारखा सुचविल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. 

सामंत यांनी पत्रकारांना सांगितले की, कॉलेज सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य राहील. याआधी कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आधी घेतला होता.

Web Title: CoronaVirus News College to open from next week!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.