शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

CoronaVirus: एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी घ्या; फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 7:56 PM

Coronavirus फडणवीस यांचा राज्यभरातल्या शक्ती केंद्र प्रमुखांशी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह संवाद साधला. सोशल डिस्टन्सिंग राखून गरजूंना मदत करा. लॉकडाऊनमुळे एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं. फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राज्यभरातल्या ३१ हजार शक्ती केंद्र प्रमुखांशी आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं. 'लॉकडाऊनमुळे कोणीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. प्रत्येकाला अन्न मिळेल याची काळजी घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डी यांनी तशी अपेक्षा व्यक्त केली आहे,' असं फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या काही महत्त्वाची निर्णयांची माहिती फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दिली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी पाहता पंतप्रधानांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. आयकर, जीएसटी भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ३१ मार्चला आयकर आणि जीएसटी भरावा लागणार नाही. याशिवाय बँकाचे हफ्ते भरण्यासही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय, खासगी, जिल्हा बँकांना कर्जवसुली करता येणार नाही. भविष्याचा विचार करुन व्याजदरदेखील कमी करण्यात आले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. लोकांच्या मदतीसाठी मेहनत घ्या. सोशल डिस्टन्सिंग पाळून गरजूंना सहकार्य करा. या काळात शेतकरी, मजूर, स्वच्छता कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी जास्त समन्वय राखण्याची आवश्यकता आहे', असं फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधान सहाय्यता निधीत जास्तीत जास्त मदत करा. तुमची लहानशी मदतदेखील महत्त्वाची आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावून या कठीण काळात देशाला विजयी करण्यासठी प्रयत्न कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा