शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

CoronaVirus: निलंबनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून एसटीचे सुमारे 50% कर्मचारी गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 10:55 PM

महाव्यवस्थापकांच्या आदेशानंतरही निम्मे कर्मचारी अनुपस्थित

मुंबई : अत्यावश्यक सेवेसाठी एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश महाव्यवस्थापकाकडून देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास निलंबित करण्यात येणार आहे. मात्र तरीदेखील एसटीचे सुमारे ५० टक्के कर्मचारी गैरहजर राहिल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी चालक, वाहक, पर्यवेक्षीय व इतर कर्मचाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. मात्र, सुमारे 50 टक्के कर्मचारी कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्तव्यावर जात असलेल्या कर्मचाऱ्याचे बळ कमी होत आहे. लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाच्या 600 गाड्यांचे नियोजन केले आहे. तर त्याप्रमाणेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील एसटी डेपोच्या सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापकानी दिले आहेत. मात्र या आदेशाचे पालन कर्मचाऱ्याकडून केले जात नसल्याचे दिसून येत आहे. एकूण नियोजन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. त्यामुळे एसटीच्या अपुऱ्या फेऱ्या होत आहेत. 

लॉकडाऊन असल्याने कामगारांना आगारात पोहोचण्यासाठी पर्यायी वाहतूक नाही. काही कामगार मुंबई महानगराबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई येण्यास सुविधा नाही. परिणामी आगारात पोहोचायचे कसे, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.  मात्र काही कर्मचारी घरात बसून आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस