Corona virus : होम क्वारंटाईन असूनही घराबाहेर पडत असाल तर थांबा ! तुमच्यावर नजर आहे " या "अ‍ॅपची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 10:29 PM2020-03-27T22:29:59+5:302020-03-27T22:46:51+5:30

होम क्वारंटाइन व्यक्तीशी थेट संपर्क टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर पोलीस कर्मचार्‍यांना मदत करेल.

Corona virus : Home Quarantine will be monitored by a police app | Corona virus : होम क्वारंटाईन असूनही घराबाहेर पडत असाल तर थांबा ! तुमच्यावर नजर आहे " या "अ‍ॅपची

Corona virus : होम क्वारंटाईन असूनही घराबाहेर पडत असाल तर थांबा ! तुमच्यावर नजर आहे " या "अ‍ॅपची

Next
ठळक मुद्देसॉफ्टवेअर प्रणाली विकसित : पुणे पोलिसांचे कामगिरी

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात होम क्वारंटाइन व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी चेहर्‍यावरुन ओळख पटविणारे सॉफ्टवेअर प्रणाली पुणे पोलिसांनी विकसित केली आहे. होम क्वारंटाइन व्यक्तीशी थेट संपर्क टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर पोलीस कर्मचार्‍यांना मदत करेल. या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट खालील प्रमाणे असतील. 
सेल्फी बेस असलेले हे अ‍ॅप चेहर्‍याच्या ओळखीवरुन काम करत आहे. यामुळे कोरोना बाधित व्यक्तीशी थेट संपर्क टाळण्यासाठी पोलिसांनी खूप उपयोगी ठरणार आहे. तसेच त्यांच्यावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. 
अनेक संशयितांना होम क्वारंटाईन केले जात आहे. या व्यक्ती घरीच राहतात की हे पोलिसांना प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी लागते. सेल्फी अ‍ॅपवर संबंधिताचा चेहरा आणि स्थान ट्रॅकिंग सिस्टीम प्रवाशांचे नाव, फोन नंबर, सेल्फी आणि इतर संबंधित माहितीसह त्यांची नोंदणी केली जाते. प्रवासी अ‍ॅपचा वापर करुन आपली नोंदणी तपशील अपलोड करतात. त्यानंतर विद्यमान व्यक्तीच्या मुख्य सुचीच्या विरुद्ध पडताळणी केली जाते. एकदा नोंदणी मंजूर झाल्यावर सेल्फी अ‍ॅपमुळे व्यक्तीला रिअलटाइममध्ये स्थान टॅगिंगसह सेल्फीच्या रुपात त्याची उपस्थिती अपलोड करण्यास सक्षम होते. त्यानंतर त्या व्यक्तीची माहिती एका क्लाऊड बेसमध्ये सर्व्हरमध्ये साठविली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तींवर सेल्फी व दाखविलेल्य स्थानासह नजर ठेवली जाईल. ज्या ठिकाणी सेल्फी व दाखविलेल्या स्थानासह नजर ठेवली जाईल. ज्या ठिकाणी क्वारंटाईन केले आहे. त्या ठिकाणी क्लाऊड बेसद्वारे लक्ष ठवेून त्या व्यक्तीचा चेहरा ट्रकिंग करेल. त्या व्यक्तीचा चेहरा न जुळल्यास तत्काळ त्याचा अलर्ट पोलीस अधिकार्‍यांना मिळणार आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी तत्काळ क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित संशयित व्यक्तीचा शोध घेतील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अ‍ॅप उपयोगी ठरणार असून पोलिसांवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

Web Title: Corona virus : Home Quarantine will be monitored by a police app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.