COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 20:07 IST2025-05-26T20:04:57+5:302025-05-26T20:07:04+5:30

COVID-19 in India: भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

Corona is increasing in India, the number of infected people has crossed 1000, 209 patients have been registered in Maharashtra | COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!

COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!

भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून देशात आतापर्यंत एकूण १ हजार ९ रुग्णांची नोंद झाली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळली आहेत. केरळनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०० हून अधिक जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये सध्या सर्वाधिक ४३० रुग्ण सक्रीय आहेत. तर, महाराष्ट्रात एकूण २०९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर दिल्ली-१०४ रुग्ण, गुजरात- ८३ रुग्ण आणि कर्नाटकात एकूण ४७ रुग्ण आढळून आली आहेत. दरम्यान, मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणाला २२ मे २०२५ रोजी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य मंत्रालय सतर्क आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शनिवारी (२४ मे २०२५) केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी अनेक राज्यांमध्ये नोंदवलेल्या कोविड-१९ प्रकरणांच्या संदर्भात आढावा घेतला. देशात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली, जी घरीच स्वत:ची काळजी घेत आहेत. आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

नागरिकांना आवाहन
सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय, लोकांना हातांची स्वच्छता, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे आणि अनावश्यक गर्दी टाळणे यांसारख्या मूलभूत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Corona is increasing in India, the number of infected people has crossed 1000, 209 patients have been registered in Maharashtra