शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:29 IST

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केले.

Minister Babasaheb Patil on Farmer Loan Waiver : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी संपूर्ण शेतीच वाहून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान केले. तसेच आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो अशीही कबुली मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी  केली जातेय. अशातच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे म्हटलं जात आहे.

"लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास यांच्यासारखा माणूस गेला आणि लोकांनी सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. लोकांनी काय मागावं हे ठरवावं. अनिलभाई आजची वेळ मारुन नेण्यासाठी नदीही देऊन टाकू तुला म्हणतील. म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागायचं हे ठरवायला हवं. निवडणुकीत निवडून यायचं आहे म्हणून आम्ही आश्वासने देतो," असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.

मंत्री बाबासाहेब पाटील हे काही महिन्यांपूर्वी देखील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही त्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मंत्रिपदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. पत्रकारांनी अनिल पाटील यांच्या संभाव्य मंत्रिपदाविषयी त्यांना तेव्हा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, गेल्यावेळी अनिल पाटलांना मंत्रिपद दिले तेव्हा गोड वाटलं का? असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. यावेळीही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसेच कर्जमाफीच्या विषयावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय.

बाबासाहेब पाटील यांची दिलगिरी

"ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रात गोळुकसारखी व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. माझ्याही मतदारसंघात पतसंस्था आहे, आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. मी सुद्धा शेतकरी आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असं स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister's loan waiver remark sparks outrage: Promises made just to win.

Web Summary : Minister Babasaheb Patil's controversial statement on loan waivers angered farmers already hit by heavy rains and crop loss. He admitted promises are made to win elections, later expressing regret after backlash.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJalgaonजळगावViral Videoव्हायरल व्हिडिओFarmerशेतकरी