शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर-ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर

By admin | Updated: November 14, 2014 23:06 IST

अकोल्यानजिकची घटना.

बाभूळगाव जहाँगिर (अकोला): भरधाव ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक ठार, तर ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अकोलानजिक असलेल्या बाभूळगाव जहागिर येथे घडली. अकोला येथील बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच २0-७१४४ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून औषधी साहित्य घेऊन अकोल्याकडे येत होता. अकोल्याहून अमरावतीकडे स्फोटक पावडर घेऊन जात असलेल्या जीजे 0९ एव्ही ३३२0 क्रमांकाच्या कंटेनरने बाभूळगाव जहांगिरनजीकच्या वळणावर ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ट्रकच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. यात कंटेनर चालक जागीच ठार झाला, तर ट्रक चालक भानुप्रताप ठाकूर (रा. कैलास टेकडी, अकोला) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहि ती मिळताच सिव्हिल लाइन्श पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमीस अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात हलविले. या अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दीड तास वाहतूक ठप्प पडली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालकाचा मृतदेह कंटेनरच्या केबीनमध्येच पडून होता. *मोठा अनर्थ टळलाअपघातग्रस्त कंटेनर स्फोटक पावडर घेऊन जात होता. अपघात झाल्यानंतर कंटेनरच्या समोरच्या भागातून धूर निघत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या बंबाने कंटेनरवर पाण्याचा वर्षाव केल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.