शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा राष्ट्रवादीत फूट पाडण्याचे काँग्रेसचे प्रयत्न अयशस्वी

By admin | Updated: December 27, 2014 04:24 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा नेत्यांना पक्षात ओढण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्यामार्फत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा नेत्यांना पक्षात ओढण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्यामार्फत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, असे फालेरो यांनी ठरविले होते. तिघांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याची जबाबदारी फालेरो यांनी कळंगुटचे माजी आमदार फर्नांडिस यांच्यावर सोपवली होती. फर्नांडिस यांची तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाली. हळर्णकर, डिसोझा व डिमेलो यांनी बैठकीत भाग घेतला. तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्यातरी सोडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर फर्नांडिस यांनी फोनवरून तिघांनाही फालेरो यांच्याशी बोलायला लावले. फालेरो यांच्याशी बोलणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जानेवारीत काय तो निर्णय कळवतो, असे फालेरो यांना सांगितले. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढणार नाही, उलट काँग्रेसच्याच उमेदवारीवर २०१७मध्ये तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, असे चित्र काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर उभे केले आहे.