शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा ठरला; कुठे देणार भेट, कसे असणार नियोजन? पाहा, कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 23:32 IST

Congress MP Rahul Gandhi Visit Maharashtra: लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर राहुल गांधी प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Congress MP Rahul Gandhi Visit Maharashtra: आताच्या घडीला विविध राज्यांमध्ये निवडणुका आहेत. महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेची लय विधानसभेत कायम राहील, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत कमबॅक करत सत्ता राखण्याचे आव्हान महायुतीकडे असणार आहे.  यातच आता काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांचा कार्यक्रम ठरला असून, कुठे आणि कसे नियोजन असेल, याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

राहुल गांधी उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण महर्षी महाराष्ट्राचे माजी मंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण करण्यासाठी राहुल गांधी सांगली जिल्ह्यात येत आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली असून, महाविकास आघाडीकडून पश्चिम महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शनही केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

राहुल गांधी यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार

सांगलीला जाण्यापूर्वी राहुल गांधी नांदेड येथे जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. नांदेडहून थेट कोल्हापूरला विमानाने जाणार असून, कोल्हापूरमधून हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कैलासवासी पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली आहे. कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीही राहुल गांधी यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNandedनांदेडNandedनांदेडSangliसांगली