‘काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही’, काँग्रेसचं भाजपाला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:10 IST2026-05-12T15:08:08+5:302026-05-12T15:10:49+5:30
Congress Criticize BJP : काँग्रेसला प्रत्युत्तर देताना भाजपाने काँग्रेसच्या सत्ताकाळातील काही निर्णयांचे फोटो आणि वृत्तपत्रातील कात्रणे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर जोरदार पलटवार केला आहे.

‘काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही’, काँग्रेसचं भाजपाला प्रत्युत्तर
आखातातील तणावामुळे भडकलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत असलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी देशवासियांनी वर्षभर सोन्याची खरेदी करू नये, तसेच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, असं आवाहन केलं होतं. त्यावरून काँग्रेसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपानेकाँग्रेसच्या सत्ताकाळातील काही निर्णयांचे फोटो आणि वृत्तपत्रातील कात्रणे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपची ‘लाचार’ आयटी सेल आपल्या मालकाची उडालेली लक्तरं सावरण्यासाठी आता जीवाचं रान करत आहे. स्वतःचा नाचक्की लपवण्यासाठी फेक न्यूज आणि वृत्तपत्रांची बनावट कात्रणं छापण्याचा कारखानाच त्यांनी उघडला आहे. “इंदिराजींनी सोनं खरेदीला बंदी घातली होती” किंवा “मनमोहन सिंगांनी इंधन रोखलं होतं”... अशा बाळबोध आणि निर्लज्ज पुड्या आता त्यांच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या गटारातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सावध राहा, हा तोच राजा आहे जो अमेरिकेसमोर झुकला, त्यांच्या तालावर नाचला आणि आता स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी भारतीय जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. या भ्रमीष्ट टोळीच्या थापांना बळी पडू नका.
भाजपची ‘लाचार’ आयटी सेल आपल्या मालकाची उडालेली लक्तरं सावरण्यासाठी आता जीवाचं रान करत आहे. स्वतःचा नाचक्की लपवण्यासाठी फेक न्यूज आणि वृत्तपत्रांची बनावट कात्रणं छापण्याचा कारखानाच त्यांनी उघडला आहे. “इंदिराजींनी सोनं खरेदीला बंदी घातली होती” किंवा “मनमोहन सिंगांनी इंधन रोखलं… pic.twitter.com/uMNQ2043DM
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 12, 2026
काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वाने देशाला नेहमीच दिशा दिली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा काँग्रेसने ढाल बनून जनतेचं रक्षण केलं. त्यांनी जबाबदारी झटकून पळ काढला नाही किंवा संकटाच्या काळात इव्हेंटबाजी केली नाही! काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.