शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचाही घटस्फोट

By admin | Updated: September 25, 2014 20:18 IST

राज्यात १५ वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेल्या आघाडीचाही आज घटस्फोट झाला.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २५ - राज्यात १५ वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेल्या आघाडीचाही आज घटस्फोट झाला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज राष्ट्रवादीने केली. काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीची ताकद असतानाही कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना - भाजपा युती तुटल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेली आघाडी संपुष्टात आल्याने आता निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत प्रबळ पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असून राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. २००९ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला ७१ जागा तर काँग्रेसला ६९ जागा मिळून सुध्दा राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यास कमीपणा मानला नाही. असे असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्याने काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.