शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

तरर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ

By admin | Updated: January 20, 2015 01:22 IST

शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कार्यरत पोलीस उपअधीक्षकाने दारू ढोसून कार्यालयातच धिंगाणा घातला. या प्रकरणाची तक्रार फे्रजरपुरा पोलीस

फे्रजरपुरा ठाण्यात तक्रार : बिनतारी संदेश कार्यालयातील घटनाअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कार्यरत पोलीस उपअधीक्षकाने दारू ढोसून कार्यालयातच धिंगाणा घातला. या प्रकरणाची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. नितीन जुवेकर असे या पोलीस उपअधीक्षकाचे नाव असून उल्लेखनीय म्हणजे यावेळी तो ड्युटीवर होता.पोलीस निरीक्षक अनिल साखरे यांनी त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे. पोलीस विभागाचे विभागीय बिनतारी संदेश कार्यालय अमरावतीत आहे. येथे कार्यरत पोलीस उपअधीक्षक नितीन जुवेकर हे सोमवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात दाखल झाले. अतिमद्यप्राशनामुळे त्यांचा तोल जात होता. खुर्चीवर नीट बसू शकत नसल्याने त्यांना अन्य अधिकाऱ्यांनी हटकले. मात्र, अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करीत कार्यालयातील उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनाही त्यांनी असभ्य वागणूक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अनिल साखरे यांच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. जुवेकर यापूर्वीसुध्दा दारु पिऊन कार्यालयात आल्याची तक्रार १३ जानेवारी रोजी फे्रजरपुरा ठाण्यात करण्यात आली होती.त्यावेळी त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यांना समज देऊन पुन्हा कामावर रुजू करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सोमवारी दाखल तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी जुवेकरविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनिय ८५ तसेच भादंविच्या कलम ५०४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. हा तर नेहमीचाच प्रकारएसीपी दर्जाचे नितीन जुवेकर हे नेहमीच नशेत असतात. त्यांची पुणे येथील पोलीस विभागाच्या मुख्यालयात ३ डिसेंबर २०१४ रोजी फॅक्सद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पोलीस विभागातील कर्मचारी असल्यामुळे त्यांना कारवाईत मुभा देण्यात येत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अन्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)