शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: February 23, 2015 02:37 IST

कष्टकरी-कामगारांचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या रविवारच्या बंदला राज्यात

मुंबई : कष्टकरी-कामगारांचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या रविवारच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह पुरोगामी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता.कोल्हापुरातील सर्व संस्था-संघटना, तालीम व तरुण मंडळे, उद्योजक-व्यापारी, फेरीवाले आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. बंदकाळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील विविध तरुण मंडळांनी फलक लावून पानसरेंच्या हत्येचा निषेध नोंदविला.पुण्यात विविध कार्यक्रमपुणे शहर व जिल्ह्यात बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी केलेली आंदोलने आणि कार्यक्रमांव्यतिरिक्त बंदचे स्वरूप संमिश्र स्वरूपाचे होते. विदर्भात निदर्शनेच्विदर्भात नागपूर, भंडारा, यवतमाळ, गडचिरोलीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसह पुरोगामी विचारांचे पक्ष आणि संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. दुपारी झाशी राणी चौकात निदर्शने करण्यात आली. यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात सकाळी रास्ता रोको करण्यात आला. वणी शहरातही दुकाने बंद होती. गोंदियात भाकपच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर शोकसभा झाली. नाशिकमध्ये धरपकड : नाशिकमध्ये शालिमार परिसरात दुकाने बंद करण्यास गेलेले डाव्या पक्षांचे नेते व सुमारे १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली़ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाले.सोलापूरमध्ये शोकसभा : सोलापूरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा झाली. विवेकवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास एक पानसरे गेले तर हजार तयार होतील, असे मत यावेळी व्यक्त झाले.