शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

समितीला महिन्याची मुदतवाढ

By admin | Updated: October 15, 2015 02:34 IST

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्याद्वारे सदनिका वाटपात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला मंगळवारी उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

मुंबई : मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्याद्वारे सदनिका वाटपात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला मंगळवारी उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. या समितीची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपत होती. या कोट्यातून एकाच व्यक्तीला अनेक सदनिकांचे वाटप करण्यात आल्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी या गैरकारभाराची चौकशी करण्याकरिता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. ए. पाटील यांची एकसदस्यीय समिती नेमली. या समितीला ३१ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र, कामाचा व्याप जास्त असल्याने आणखी एक महिन्याची मुदत वाढवून देण्यासाठी समितीने न्यायालयाला पत्र लिहिले. न्या. पाटील यांनी अहवाल लिहिण्यास सुरुवात केली असून, आॅक्टोबरपर्यंत अहवालाचे काम संपेल, तरीही पूर्ण काम संपवण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती न्या. पाटील यांच्या सचिवांनी उच्च न्यायालायाला केली. वाढीव महिन्याचे मानधन न्या. पाटील घेणार नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांची प्रशंसा करत, समितीला काम पूर्ण करण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढवून दिली.