शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

कोल कार्टेल २००१ पासून

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

प्रतिस्पर्धा अपीलीय लवादाने महाजेनको आणि तीन कोळसा कंपन्यांना नोटीस दिल्यानंतर अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर येत आहेत.

महाजेनकोचा आशीर्वाद : ग्राहकांवर ११,६०२ कोटींचा अतिरिक्त भारनागपूर : प्रतिस्पर्धा अपीलीय लवादाने महाजेनको आणि तीन कोळसा कंपन्यांना नोटीस दिल्यानंतर अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर येत आहेत. विशाखापट्टणम येथील बीएसएन जोशी अ‍ॅण्ड कंपनीचे डॉ. अरविंद जोशी यांनी शनिवारी ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ आर.बी. गोयनका यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना २००१ पासून सुरू असलेले कोळशाचे कार्टेल आणि काही संशयास्पद बाबींचा खुलासा केला. कोळसा पुरवठा कंत्राट यंत्रणेचा इतिहास त्यांनी सांगितला. ही यंत्रणा १९८९ मध्ये पहिल्यांदा दाखल करण्यात आली. त्यावेळी कोळसा पुरवठा कंत्राटासाठी २१ पैसे टन शुल्क आकारले जायचे. हे शुल्क ५ रुपयांवरून ५५ रुपयांपर्यंत कसे गेले आणि त्यासाठी महाजेनकोचे वरिष्ठ अधिकारी कार्टेलसाठी कशी मदत करतात, याच्या छुप्या बाबींची खुलासेवार माहिती त्यांनी दिली.जोशी यांनी सांगितले की, नोटीस मिळालेल्या तीन कंपन्यांच्या फायद्यासाठी महाजेनकोने २००९ ते २०१३ या चार वर्षात निविदा काढल्या नाहीत. मागे वळून पाहता २००१ मध्ये कार्टेलमध्ये सहभागी कंपन्यांनी महाजेनकोच्या सातही कोळसा खाणींना आपसात वाटून घेतले. चंद्रपूर आणि नाशिक वीज प्रकल्प नायर कोल सर्व्हिसेसकडे, पारस आणि भुसावळ नरेश कुमार आणि कंपनी तर कोराडी, खापरखेडा आणि परळी वीज प्रकल्प करमचंद थापर या कंपनीकडे आले. सर्वच कंत्राटदार एकमेकांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करीत नव्हते, शिवाय निविदा मिळविण्यासाठी एकमेकांना मदत करायचे. हा सर्व प्रकार इंधन व्यवस्थापन सेलचे मुख्य अभियंता आणि व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाच्या संगनमताने सुरू होता. गेल्यावर्षी जून महिन्यात महाजेनकोने कोळशाचे पुरवठा कंत्राट चार कंपन्यांना दिले. नायर कोल सर्व्हिसेसला वेकोलिची खाण, करमचंद थापर अ‍ॅण्ड कंपनीला महानदी कोलफिल्ड लिमिटेड (एमसीएल), नरेश कुमार अ‍ॅण्ड कंपनीला साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (एसईसीएल) तर चेन्नई येथील सिकॉल लॉजिस्टिक कॉलरीज या चौथ्या कंपनीला कोळसा पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले. पण या कार्टेल कंपन्यांनी सिकॉलच्या निविदेला जाणीवपूर्वक आव्हान देत न्यायालयीन प्रक्रियेत अडकविले.