शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

जशास तसं! राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:23 PM

राज ठाकरेंच्या एका वाक्यातल्या टीकेला उद्धव यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वचनपूर्वी मेळाव्यातून प्रत्युत्तर दिलं. मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे, असा टोला उद्धव यांनी राज ठाकरेंना लगावला. मुंबईतल्या बीकेसीमध्ये शिवसैनिकांकडून उद्धव यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 'शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. तसा शब्द मला भाजपाकडूनही देण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांनी तो शब्द फिरवला. बाळासाहेबांची खोली शिवसैनिकांसाठी मंदीर आहे. या खोलीत दिलेलं आश्वासन भाजपानं मोडलं. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. तसं झालं असतं तर मी शिवसैनिकांसमोर कसा जाऊ शकलो असतो,' असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. मी केवळ उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे कधीही जबाबदारीपासून पळ काढलेला नाही आणि यापुढेही काढणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. मित्रपक्षानं विश्वासघात केल्यानं विरोधकांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यावरुन शिवसेनेचा चेहरा उघडा पडला, अशी टीका होते. मात्र २०१४ मध्ये तुम्ही संपूर्ण उघडे झाला होतात, त्याचं काय, असा प्रश्न उद्धव यांनी विचारला. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली. तेव्हा सत्ता स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतलीत. तेव्हा तुम्ही पूर्ण उघडे झालात, अशी टीका उद्धव यांनी भाजपावर केली. शिवतीर्थावर शपथ घेताना मला जुन्या शिवसैनिकांची आठवण येत होती, असं उद्धव यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहासनाच्या दिशेनं पाऊल टाकताना प्रत्येक पावलावर स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची आठवण झाली. महाराजांची ही भावना होती, तर त्यांना दैवत मानणारे आम्ही त्यांच्यासमोर कस्पटासमान आहोत, असं उद्धव म्हणाले. शिवसैनिक माझे सुरक्षाकवच आहेत. त्यांचे आमच्या कुटुंबावर उपकार आहेत. त्यामुळे त्यांचा विश्वासघात ठाकरे कुटुंबाकडून कधीही होणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा