शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचे सिनेस्टाईल अपहरण पडले महागात

By admin | Updated: November 21, 2014 00:52 IST

ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेल्या शिवानी गजबे या चार वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून

दोघांना अटक : रायपूर रेल्वे स्थानकावरून मुलगी पोलिसांच्या ताब्यातचंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेल्या शिवानी गजबे या चार वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून शिवानीला रायपूर (छत्तीसगड) रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले. मुलगी सुखरुप असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केली. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेऊन माहिती दिली. कबिंद्र लाजपतसिंग ठाकूर (२३) रा. ढकीया जि. रायपूर (छत्तीसगड) व अमित दिलीप थापा (२०) रा. तहेली, ता. जि. ओकरुर (मणिपूर) अशी अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. १९ नोव्हेंबरला शाळा सुटल्यावर आरोपीने शिवानीचे अपहरण करुन खंडणीची मागणी केली होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी मुलीच्या शोधासाठी एका विशेष पथकाला रवाना केले. मात्र शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून शिवानीच्या वडिलांचा व्यावसायिक भागिदार असलेल्या कबिंद्रला देसाईगंज येथे ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने आपणच मुलीचे अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी दम दिल्यानंतर कबिंद्रने मोबाईलवरुन दुसरा आरोपी अमित याच्याशी संपर्क साधला. तेव्हा अमित हा मुलीला घेऊन गोंदियावरुन रेल्वेने रायपूरला निघाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तिकस यांच्या नेतृत्वात पोलीस पथक रायपूरला रवाना झाले. तेथे अमितला पकडून शिवानीला ताब्यात घेण्यात आले. पोलिस पथक शिवानीला घेऊन आज सकाळी ६ वाजता ब्रह्मपुरी येथे दाखल झाले. तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपी कबिंद्र ठाकूर व अमित थापा याच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा तपास ब्रह्मपुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)मुलीचा प्रवास ब्रह्मपुरी-देसाइगंज-गोंदिया-रायपूरकबिंद्र हा मुलीच्या घरी नेहमी येत असल्याने त्याला ती ओळखत होती. त्यामुळे ती शाळा सुटल्यावर त्याच्यासोबत सहज गेली. कबिंद्रने तिचे अपहरण करुन देसाईगंज (गडचिरोली) येथे नेले. त्यानंतर त्याने आपला सहकारी अमित थापा याला बोलावून तिला त्याच्या ताब्यात दिले व १२. ४५ वाजता रेल्वेने दोघांनाही गोंदिया येथे रवाना केले. आपल्यावर कुणाचाही संशय येऊ नये, यासाठी कबिंद्र देसाईगंज येथे फिरत होता.