शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, पालकांना ११ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 12:16 IST

दोघांच्याही पालकांची तब्बल ११ लाखाने फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

ठळक मुद्दे गेम खेळत असताना वडिलांच्या खात्याचा ओटीपी दिला.साडेनऊ लाखाची फसवणूक होईपर्यंत हा प्रकार घरातील मंडळीच्या लक्षातच आला नाही. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : मोबाईलवरील ‘गेम’ शहरातील दोन विद्यार्थ्यांच्या अंगलट आला आहे. त्यामुळे दोघांच्याही पालकांची तब्बल ११ लाखाने फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. याशिवाय विविध संदेशाची हाताळणी केल्याने अनेक पालकांचे बँक खाते रिकामे होत असल्याचे धक्कादायक वास्तव हळुहळु पुढे येत आहे. त्यामुळे ‘ऑनलाइन’ अभ्यासक्रम अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते.कोविड संक्रमण काळात तब्बल नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लावण्यात आला. या कालावधीत शाळा, महाविद्यालय बंद होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाने सोशल माध्यमांचा वापर करीत ऑनलाइन अभ्यासक्रमाचा फंडा अंमलात आला. त्यामुळे मोबाईल वापरास मनाई करणाºया पालकांनीही विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास मुभा मिळाल्याने अभ्यासक्रमासोबतच विविध अ‍ॅप हाताळण्यास सुरूवात केली. काहींनी अभ्यासक्रमासोबतच ऑनलाइन गेम खेळण्यासाठी या संधीचा वापर केला. पालकांनी मुलांना दिलेली संधीच आता पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर काही पालकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे.

एकास साडेनऊ लाखाचा चूना!  मोबाईलवर ‘गेम’खेळणे एकाच्या चांगलेच अंगलट आले. दररोज २९ हजार रूपयांप्रमाणे साडेनऊ लाखाची फसवणूक होईपर्यंत हा प्रकार घरातील मंडळीच्या लक्षातच आला नाही.   याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राईमकडे वळता करण्यात आला आहे.

‘फायर’ गेम पडला दीड लाखात!शहरातील मुख्य वस्तीतील एका विद्यार्थ्याने फायर गेम खेळला. गेम खेळत असताना वडिलांच्या खात्याचा ओटीपी दिला. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या पालकाची टप्प्याने तब्बल दीड लाखाने फसवणूक झाली.

विविध संदेश हाताळणीचाही फटका! मोबाईलवर आमिष आणि प्रलोभणे देणारी अनेक संदेश येतात. पैसे जिंकल्याच्या संदेशाचाही यामध्ये समावेश आहे. तसेच डेटींग, चॅटींग आणि मिटींग सारखे शेकडो संदेश मोबाईल वर धडकतात. या संदेशाच्या गांभीर्याबाबत अनभिज्ञ असलेल्या अनेक लहान विद्यार्थ्यांकडून संबंधीत संदेश हाताळले गेलेत.   त्यामुळे आता पालकांची खाती रिकामी होण्यास सुरूवात झाली आहे. साडेचार हजारांपासून, दहा हजारापर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शाळांनी स्वत:च्या लाभासाठी सुरू केलेले ‘ऑनलाइन’ शिक्षण पालकांसाठी चांगलेच महागात पडत असल्याचे दिसून येते.

 

मोबाईलवर गेम खेळल्यानं साडेनऊ लाखाच्या फसवणूक प्रकरणाची शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मोबाईलवर गेम खेळताना अथवा संदेशाची हाताळणी केल्यानंतर ओटीपी दिल्यास फसवणूक होऊ शकते. ऑनलाइन फसवणुकीच्या सहा-सात प्रकरणं आली आहेत. मुलांकडे मोबाईल देताना पालकांनी सतर्क असणे आवश्यक आहे.- सुनील अंबुलकरशहर पोलीस निरिक्षक, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावcyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइनStudentविद्यार्थी