शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले कुलदेवतेचे दर्शन

By admin | Updated: July 5, 2017 02:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा-नृसिंहपूर येथे आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन येथे चालू असलेल्या विविध विकासकामांचा

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा-नृसिंहपूर येथे आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन येथे चालू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता, मातोश्री  सरिता यांच्यासह कुलदैवत असणाऱ्या नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील लक्ष्मी-नृसिंहाची विधिवत महापूजा व आरती केली.या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, पुजारी कमलेश डिंगरे, भाजपा तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अतुल तेरखेडकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, तानाजीराव थोरात, बाबासाहेब चवरे, माऊली वाघमोडे, सचिन आरडे, मारुती वणवे, सदानंद शिरदाळे, अ‍ॅड. नीलेश शिंगाडे, रामचंद्र निंबाळकर, श्रीकांत दंडवते, जगदीश सुतार, नरहरी काळे, नाथा मोरे, दिगांबर डिंगरे, दशरथ राऊत, संतोष मोरे, दत्तात्रय ताटे-देशमुख आदींसह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या-ज्या वेळी इंदापूर तालुक्यात येतात, त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. ती आजही पाहायला मिळाली. भाजपाचे कार्यकर्ते पाठीमागे पण राष्ट्रवादीचे पुढे दिसत होते. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनाही संभ्रमात पडल्याचा अनुभव मिळाला. यावेळी नीरा-नृसिंहपूर येथे मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदयसिंह पाटील, कृष्णा यादव, महादेव घाडगे, विलासराव वाघमोडे, करणसिंह घोलप, लालासो पवार, कांतिलाल झगडे आदी उपस्थीत होते.मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, अशी आशा होती. त्यातून बोलण्यासाठी देखील तशी पत्रकारांनी विनंती केली. परंतु त्यांनी हात जोडून नकार दिला.दर्जेदार कामे करा...मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष्मी-नृसिंह देवस्थान येथील महापूजा व दर्शन झाल्यावर येथील पुरातन असणाऱ्या माणकेश्वर वाडा येथे सुरू असलेल्या भक्तनिवास, पर्यटन भवन, बहुउद्देशीय इमारत आदी कामांची पाहणी करून दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.