शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या दुष्काळासंदर्भात फडणवीसांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:28 IST

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही...

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. सत्तेत आणि मुख्यमंत्रीपदात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून बसली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. तर अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शाहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( एनडीआरएफ ) चे अध्यक्षपद गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. आपत्ती निवारण निधीचे वाटप करण्याचे अधिकार शहा यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली आहे. 

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात कुणाचा सरकार येणार व शेतकऱ्यांना मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

 

एखांद्या राज्यात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपती आल्यास तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम राज्य सरकारचे असते. या सर्वाची विशेष जवाबदारी राज्य कृषिमंत्री यांच्यावर असते. मात्र मदत करण्यासाठी लागणारी रक्कम राज्यसरकारकडून पुरवणे किंवा आपत्ती मोठी असल्यास केंद्र सरकारकडे राज्य सरकार मदत मागू शकतो.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ