शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज परिसरात चंदन तस्कर टोळ्या पुन्हा सक्रिय

By admin | Updated: October 25, 2015 23:55 IST

पोलिसांना आव्हान : कर्नाटकातील चंदन मिरजमार्गे उत्तर भारतात; बोगस परवान्यांचा वापर

मिरज : मिरजेत बंद झालेला छुपा चंदन तस्करीचा व्यवसाय पुन्हा एकदा ग्रामीण भागात सुरू झाला आहे. कर्नाटकातील जंगलातून चोरून आणण्यात येणारे चंदन उत्तर भारतात पाठविणाऱ्या टोळ्या मिरज पूर्व भागातील गावात सक्रिय आहेत. चंदनाचे तेल काढणारे कारखाने बंद करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे व पोलीस यंत्रणेच्या प्रतिबंधामुळे मिरजेतील चंदन तस्करीला आळा बसला होता. मिरजेतील नगरसेवकांसह अनेक बडी धेंडे चंदन तस्करीमध्ये असल्याने, दोन दशकांपूर्वी मिरज हे चंदन तस्करीचे प्रमुख केंद्र होते. चंदन तस्करी व चंदनाच्या झाडांच्या चोऱ्यांमुळे वन विभागाने चंदनाचे तेल काढण्याच्या उद्योगासह, चंदनाचे झाड कापण्यासाठी, तसेच चंदनाच्या वाहतुकीसाठी देण्यात येणारा परवाना बंद केला आहे. मिरजेतील वड्डीसह जतमधील कोंत्यावबोबलाद, मुचंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व गडहिंग्लज येथील चंदनाचे तेल काढणारे उद्योग बंद झाले आहेत. मिरजेसह सांगोला, लातूर, घोडनदी, शिरूर, गडहिंग्लज परिसरात चंदन तस्करांचे जाळे आहे. कर्नाटकातील हुबळी, धारवाड, अळणावर येथील जंगलातून चोरून आणण्यात येणाऱ्या चंदनाचा मिरज पूर्व भागातील गावांत साठा करण्यात येत आहे. तेथून इंदोर, कन्नोज, कानपूर, दिल्ली येथील चंदनाचे तेल काढणाऱ्या कारखान्यांना हे चंदन पाठविण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे वन विभागाच्या बोगस परवान्याच्या आधारे चंदनाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. मिरजेत यापूर्वी चंदन तस्करांच्या व्यावसायिक स्पर्धेतून खून, मारामाऱ्यांचे प्रकार घडले आहेत. रेल्वेने चोरून जाणारे चंदन पकडल्याने पोलीस फौजदाराला चंदन तस्करांच्या दबावाने निलंबित करण्यात आले होते. तसेच एका फौजदाराचा अपघातात गूढ मृत्यू झाला होता. चंदनाची अवैध विक्री करणाऱ्या टोळ्यांमुळे मिरज परिसरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)३ ते ४ हजार रुपये किलोसौंदर्यप्रसाधने निर्मितीसाठी उत्तर भारतात चंदन व चंदनाच्या तेलाला मोठी मागणी आहे. ३ ते ४ हजार रूपये प्रति किलो दराने चंदनाची विक्री होते. मिरजेतील चंदन तस्करांचा राज्यात दबदबा आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोठेही चंदनचोरी झाल्यास तेथील पोलीस तपासासाठी मिरजेत येतात. रात्रीच्या अंधारात चंदनाचे झाड कोणत्याही आवाजाशिवाय कापून नेण्याची मिरजेतील तस्करांची खासीयत आहे.