शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील सरकार केवळ उद्योगपतींचे

By admin | Updated: October 11, 2014 06:20 IST

केंद्रातील मोदी यांचे सरकार हे केवळ श्रीमंत व उद्योगपतींचे हित जपत असून, महाराष्ट्रातील जनतेने गरिबांच्या हिताचा विचार करणारेच सरकार सत्तेवर आणावे,

नाशिक/पुणे : केंद्रातील मोदी यांचे सरकार हे केवळ श्रीमंत व उद्योगपतींचे हित जपत असून, महाराष्ट्रातील जनतेने गरिबांच्या हिताचा विचार करणारेच सरकार सत्तेवर आणावे, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.वणी (ता. दिंडोरी) व सासवड (पुणे) येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घाणाघाती टीका केली. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदींनी लोकांची फसवणूक केली आहे. काँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे ‘मनरेगा’ आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात निधी वर्ग केला जात होता. आता मोदी सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्याच खात्यात जमा होत आहे. राज्यात दुष्काळ पडलेला असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्यसुविधा पुरविल्या. अमेरिकन उद्योगपतींच्या सांगण्यावरून १०८ औषधांच्या किमतींमध्ये वाढ करण्यास पंतप्रधानांनी मान्यता दिली आहे. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखांत गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. (प्रतिनिधी)