शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:19 IST

पोलिस बनले फिर्यादी; मदत करणाऱ्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहिल्यानगर : शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲपप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ५ यूआरएलधारक (ॲप तयार करणारे) व त्यांना मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता सायबर ठाण्याने रविवारी तपासासाठी पथके नियुक्त केली आहेत.

अहिल्यानगर सायबर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. संकेतस्थळ व ॲप तयार करून देवस्थानची परवानगी न घेता ऑनलाइन पूजा, व्हीआयपी दर्शन, पूजा अभिषेक, तेल चढविणे यासाठी अनियमित दराने शुल्क घेऊन शनिभक्तांची फसवणूक केली. आरोपींनी पुजारी नेमून अवैधरीत्या ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळले. यातून शनिभक्त व देवस्थानची फसवणूक झाली. त्यामुळे बनावट ॲप तयार करणारे व त्याचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विश्वस्त मंडळ व इतर दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत शनिभक्त व देवस्थानची फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्याबाबत विश्वस्त मंडळाला कळविण्यात आले होते. परंतु, देवस्थानसह इतर कुणीही फिर्याद देण्यास पुढे आले नाही. त्यामुळे स्वतः पोलिसच फिर्यादी झाले.

‘बनावट ॲप’चा मुद्दा अधिवेशनात गाजलानेवासाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी बनावट ॲपचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर शनिदेवाच्या नावावर कुणी पैसे कमवत असेल तर त्याला सोडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तसेच त्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणताही आदेश निघालेला नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा