बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्तच

By Admin | Updated: July 3, 2016 01:06 IST2016-07-03T01:06:28+5:302016-07-03T01:06:28+5:30

बांधकाम व्यवसायाने विविध उद्योग व व्यवसाय क्षेत्र प्रभावित केले आहे. त्यामुळेच बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मुळातच प्राप्त आहे, असा दावा केंद्रीय लघु व मध्यम

The business status of the building is achieved | बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्तच

बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्तच

नाशिक : बांधकाम व्यवसायाने विविध उद्योग व व्यवसाय क्षेत्र प्रभावित केले आहे. त्यामुळेच बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मुळातच प्राप्त आहे, असा दावा केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा यांनी केला आहे.
बांधकाम व्यावसायिकांनीच याबाबत अधिकृत नोंदणी करून घ्यावी, असे ते म्हणाले. कलराज मिश्रा यांच्या या दाव्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे या क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या उद्योगाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The business status of the building is achieved