शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या एसटी बसेस मेळातून सुटणार

By admin | Updated: June 17, 2014 03:26 IST

आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नाशिकहून मुंबईला व पुण्याला सुटणाऱ्या सर्व एसटी बसेस महामार्गस्थानकाऐवजी जुन्या सीबीएससमोर असलेल्या मेळा बस स्थानकावरून सुटणार आहेत

ठाणे : आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नाशिकहून मुंबईला व पुण्याला सुटणाऱ्या सर्व एसटी बसेस महामार्गस्थानकाऐवजी जुन्या सीबीएससमोर असलेल्या मेळा बस स्थानकावरून सुटणार आहेत. नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे हे दोनही मार्ग एसटीसाठी प्रचंड फायद्याचे होते. परंतु खासगी बसेसच्या अतिक्रमणामुळे ते तोट्यात जाऊ लागल्याने त्याला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचे समजते.या दोनही मार्गांवर एकीकडे खासगी बसेस भरपूर धंदा करतात आणि एसटीचे प्रवासी मात्र घटत चालले आहेत. याची कारणे शोधली असता असे लक्षात आले की, प्रवाशांचा ताण व शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस महामार्ग स्थानकावरून सोडण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला गेला. या स्थानकासमोरच खासगी बसेसचा तळ आहे. तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या बसेसना पार्क करण्यासाठी जागा आहे. तसेच त्यांचे एजंट (वळूक) अगदी सहजपणे महामार्ग स्थानकात येऊन प्रवासी वळवून नेतात. हे टाळण्यासाठी जर ही वाहतूक सध्या फारशा वापरात नसलेल्या मेळा स्थानकात स्थलांतरीत केली तर खासगी बसेसना त्या परिसरात येणे, त्यांच्या वळूकना तिथे वावरणे व प्रवासी वळवून नेणे शक्य होणार नाही. परिणामी एसटीचे प्रवासी वाढतील व या मार्गावरील प्रवासी घट रोखली जाईल अशी भूमिका एसटीची आहे. त्यासाठी मेळा स्थानकाची काहीशी डागडुजी करावी लागेल. त्यासाठी हा कालावधी एसटी वापरेल असे समजते. पुण्याला जाणाऱ्या बसेस पाठीमागेच असलेल्या ठक्कर बाजार स्थानकातून सुटत असल्याने त्या प्रवाशांची सोय ही यामुळे साधली जाईल, असेही एसटीला वाटते आहे. ‘हे स्थलांतरण होण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी त्याबाबत तूर्तास मी माध्यमांशी काहीही बोलू शकणार नाही.’ असे यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, नाशिक यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)