शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींचे मंजूर आराखडेही येतात ‘आरटीआय’ कक्षेत

By admin | Updated: November 1, 2015 01:16 IST

शहरात खासगी जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या इमारतींचे आराखडे महापालिकेने मंजूर केल्यानंतर, ते ‘पब्लिक डॉक्युमेंट’ होत असल्याने नागरिकांनी असे आराखडे व तदनुषंगिक माहिती

मुंबई : शहरात खासगी जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या इमारतींचे आराखडे महापालिकेने मंजूर केल्यानंतर, ते ‘पब्लिक डॉक्युमेंट’ होत असल्याने नागरिकांनी असे आराखडे व तदनुषंगिक माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागितल्यास, महापालिका त्यास नकार देऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
एखाद्या प्रकरणात माहिती मागणारा व संबंधित बांधकाम करणारा यांच्यात त्याच बांधकामावरून न्यायालयात स्वतंत्रपणे वाद सुरू असला, तरी अर्जदार खासगी हेतूने माहिती मागत आहे, असे म्हणून पालिका माहिती देण्याचे टाळू शकत नाही. मागितलेल्या माहितीचा अर्जदारास खासगी कामासाठी उपयोग होऊ शकणार असेल, तरी त्या माहितीचे स्वरूप सार्वजनिक असल्याने ‘आरटीआय’नुसार ती देणे भाग आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
माहिती मागणारा व बांधकाम करणारा हे एकाच धंद्यातील प्रतिस्पर्धी असले, तरी महापालिकेने अशी माहिती ‘आरटीआय’खाली दिल्याने धंद्याची गुपिते उघड केल्यासारखे होत नाही, तसेच आर्किटेक्टने तयार केलेले आराखडे महापालिकेने एकदा मंजूर केले की, त्याची प्रत ‘आरटीआय’खाली अन्य कोणाला दिल्याने कॉपीराइटचाही भंग होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
सार्वजनिक संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे हा ‘आरटीआय’ कायद्याचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे माहिती मागणाऱ्याचा व तिच्या संभाव्य वापराचा हेतू, संभाव्य प्रतिस्पर्धा किंवा कॉपीराइट अशा मुद्द्यांवर माहिती नाकारली गेली, तर कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले.
सुप्रसिद्ध उद्योगपती नस्ली नेविल वाडिया हे दिवंगत ई.एफ. दिनशॉ यांच्या मालमत्तेचे एकमेव प्रशासकही आहेत. या मालमत्तेपैकी मालाड (प.) येथील काही जमीन विकसित करण्यासाठी वाडिया यांनी मालमत्तेचे प्रशासक या नात्याने फेरानी हॉटेल्स कंपनीशी १९९५ मध्ये करार-मदार केले व त्यांना कुलमुखत्यारपत्रही दिले. नंतर दोघांमध्ये वाद झाल्याने २००८ मध्ये वाडिया यांनी केलेले करार रद्द करून फेरानी हॉटेल्सविरुद्ध उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. तो अद्याप प्रलंबित आहे.
या पार्श्वभूमीवर वाडिया यांनी महापालिकेच्या माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करून आपण ज्या जमिनीसंबंधी फेरानी हॉटेल्स यांच्याशी करार केला होता, त्या जमिनीवर करायच्या बांधकामांचे त्यांनी सादर केलेले व मंजूर झालेले आराखडे, ले-आऊट व सब डिव्हिजन फ्लॅन इत्यादी माहिती मागितली. त्यांनी व नंतर अपिलीय अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिल्याने, वाडिया यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले व तेथे त्यांच्या बाजूने निकाल झाला होता. (विशेष प्रतिनिधी)

माहिती आयोगाच्या
निकालाविरोधात होती याचिका
मे. फेरानी हॉटेल्स प्रा. लि. या कंपनीने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. एम. एस. शंकळेशा व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्य माहिती आयोगाने यंदाच्या ३१ जानेवारी रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध ही याचिका केली गेली होती.