शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

काशिंबेग-नारोडी रस्त्याने घेतला श्वास

By admin | Updated: August 24, 2016 01:32 IST

वडगाव काशिंबेग-नारोडी रस्त्याच्या कडेला असणारी व वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडेझुडपे काढण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे

मंचर : वडगाव काशिंबेग-नारोडी रस्त्याच्या कडेला असणारी व वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडेझुडपे काढण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. याची दखल घेऊन रस्त्याला अडथळा करणारी झाडेझुडपे काढण्यात आली. मंचर येथून वडगाव काशिंबेग चिंचोडी देशपांडे मार्गे नारोडी अशा एसटीच्या दिवसभर फेऱ्या होतात. शालेय विद्यार्थ्यांना एसटीनेच प्रवास करावा लागतो. शेतमालाच्या वाहतुकीसाठीसुद्धा हा रस्ता महत्त्वाचा होता.रस्ता एकेरी वाहतूक होईल एवढाच असल्याने दोन वाहने एकाच वेळेला ये-जा करू शकत नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी झाडेझुडपे वाढली होती. रस्त्याने वाहन जाताना ही झुडपे अडथळा ठरत होती. विशेषत: वडगाव काशिंबेग ते चिंचोडी व तेथून पुढे नारोडीपर्यंत रस्त्याला अडथळा होत होता.एसटी बस बंद होण्याची शक्यता होती. दोन वाहने एकमेकांना पार होत नव्हती. त्यामुळे वाहनांना पुढे जाता येत नव्हते. रस्त्याला अडथळा ठरणारी झुडपे काढून टाकण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त देण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन या रस्त्यावरील झाडेझुडपे काढून टाकण्यात आली. (वार्ताहर)>जेसीबीच्या साहायाने रस्त्यात वाहतुकीला ठरणारी झाडे काढण्याबरोबर गवतही काढून टाकण्यात आले. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. रस्त्यावर वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. पूर्वी वळणावर झुडपे असल्याने पुढून येणारे वाहन दिसत नव्हते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती.