बॉम्बे वेलप्रिंट इंकला एसएमई पुरस्कार

By Admin | Updated: September 4, 2014 00:56 IST2014-09-04T00:56:32+5:302014-09-04T00:56:32+5:30

बॉम्बे वेलप्रिंट इंक प्रा.लिमिटेडला एसएमई पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बँक आॅफ इंडियाच्या वतीने आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाच्या सहकार्याने मुंबई येथे अलीकडेच आयोजित समारंभात बॉम्बे वेलप्रिंट

Bombay VelPrint Inklala SME Award | बॉम्बे वेलप्रिंट इंकला एसएमई पुरस्कार

बॉम्बे वेलप्रिंट इंकला एसएमई पुरस्कार

देशातील एकमेव कंपनी : ६२ हजार प्रवेशिका
नागपूर : बॉम्बे वेलप्रिंट इंक प्रा.लिमिटेडला एसएमई पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बँक आॅफ इंडियाच्या वतीने आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाच्या सहकार्याने मुंबई येथे अलीकडेच आयोजित समारंभात बॉम्बे वेलप्रिंट इंकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवी गांधी यांनी स्वीकारला. अध्यक्षस्थानी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन होत्या. मंचावर एमएसएमईएसचे केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा आणि बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा व्ही. राजलक्ष्मी अय्यर होत्या.
या पुरस्कारासाठी यावर्षी देशातून एमएसएमई क्षेत्रातून ६२ हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून बँक आॅफ इंडिया आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाने १०० सर्वोत्तम उद्योजकांची निवड केली.
विदर्भातून एसएमई क्षेत्रातून केवळ बॉम्बे वेलप्रिंट इंकला हा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय संपूर्ण देशात एसएमई क्षेत्रात पुरस्कार मिळविणारी पहिली प्रिंटिंग इंक उत्पादक कंपनी आहे.
बॉम्बे वेलप्रिंंट इंकची स्थापना १९९३ मध्ये झाली. उच्च दर्जाची प्रिंटिंग इंकची निर्मिती करते. स्थापनेवेळी दरमहा २० मेट्रिक टन उत्पादन क्षमता होती. ती वाढून आता दरमहा ५०० मेट्रिक टनवर गेली आहे. कंपनी लो वोलॅटाईल आॅर्गनिक कम्पाऊंड (व्हीओसी) इंकचे उत्पादन करते. हे उत्पादन प्रिटिंंग कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम आणि पर्यावरणाला पूरक आहे.
यावर्षीच्या अखेरीस उत्पादन क्षमता दुपटीवर नेण्याचा कंपनीचा संकल्प आहे. लोकमत ग्रुप आॅफ न्यूजपेपर, बेनेट कोलमन अ‍ॅण्ड कंपनी, राजस्थान पत्रिका, इंडियन एक्स्पे्रस, डीएनए आणि विविध संस्थांना कंपनी इंकचा पुरवठा करते. (प्रतिनिधी)

Web Title: Bombay VelPrint Inklala SME Award