बॉलीवूड शहेनशाहला वाढदिवसाची अनोखी भेट !

By Admin | Updated: October 11, 2016 05:39 IST2016-10-11T05:39:50+5:302016-10-11T05:39:50+5:30

बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन मंगळवारी ७५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त औरंगाबादेतील १० वर्षीय सारा बिश्नोई या मुलीने

Bollywood Shahenshah's unique birthday gift! | बॉलीवूड शहेनशाहला वाढदिवसाची अनोखी भेट !

बॉलीवूड शहेनशाहला वाढदिवसाची अनोखी भेट !

औरंगाबाद : बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन मंगळवारी ७५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त औरंगाबादेतील १० वर्षीय सारा बिश्नोई या मुलीने ‘बिग-बी’ला गाण्याच्या माध्यमातून अनोखी वाढदिवस भेट दिली आहे. तिच्या गाण्याच्या व्हिडिओ सीडीचे प्रकाशन सोमवारी ‘लोकमत’ भवनमध्ये लोकमत मीडिया प्रा. लि.चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
‘लोकमत’ भवनमधील प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर इंडियन लेफ्ट हॅण्डर्स क्लबतर्फे औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात साराने हे गीत सादर केले. संगीत शिक्षक प्रियांगू सिंग यांनी हे गीत लिहिले असून, शास्त्रीय गायक इंद्रनील ओक यांनी ते संगीतबद्ध केले आहे. कोरस स्वराज सरकटे आणि दिग्दर्शन संदीप काळे यांचे आहे. स्टिपिंग स्टोन हायस्कूल, रसीम रहीम आणि सतीश गोरे यांनी यासाठी सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)


 

Web Title: Bollywood Shahenshah's unique birthday gift!