शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचे रिपोर्ट हाताने अन् मोबाइलवर एक्स-रे पद्धत होणार बंद; राज्यातील शासकीय रुग्णालयात पुन्हा उभी राहतेय ऑनलाइन यंत्रणा

By अविनाश कोळी | Updated: May 19, 2026 17:37 IST

स्वतंत्र यंत्रणा उभारून काम

अविनाश कोळी

सांगली : खासगी संस्थेचे काम अचानक बंद झाल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील ऑनलाइन यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रक्तासह सर्व रिपोर्ट हाताने लिहिण्याची व एक्स-रे मोबाइलवर देण्याची कसरत रुग्णालयांना करावी लागत होती. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाने आता ऑनलाइन यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिन्याभरात राज्यात एकाचवेळी ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने रुग्णांसह शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइन कारभार करत असताना जुलै २०२२ मध्ये एका रात्रीत अचानक संबंधित एजन्सीचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून गेली चार वर्षे रुग्णालयातील कामकाज ऑफलाइन झाल्याने केसपेपरपासून विविध वैद्यकीय अहवालही हाताने लिहून देण्याची वेळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आली आहे. आता यातून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मुक्तता होणार आहे. राज्यभरात एकाचवेळी ऑनलाइन यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर रुग्णालयांना देण्यात आले आहे.

स्वतंत्र यंत्रणा उभारून काम

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑनलाइन प्रणालीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत ऑनलाइन कामकाज हाताळले जाईल. सध्या रुग्णालयांमध्ये यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

महिन्याभरात कार्यान्वित होणार यंत्रणा

कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच महिन्याभरात ही प्रणाली कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र सॉफ्टवेअरमार्फत रुग्णांचा संपूर्ण डेटा सेव्ह केला जाईल. त्यामुळे कोणताही अहवाल काही मिनिटांमध्येच उपलब्ध होईल.

शासकीय रुग्णालयातील रांगा घटणार

सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये केसपेपरपासून वैद्यकीय अहवाल तसेच औषधे घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी रांगा दिसत आहेत. नव्या यंत्रणेत केवळ आधार कार्डचा वापर करून ओपीडीत जाता येणार आहे. त्यामुळे केसपेपरसाठी रांगेत थांबावे लागणार नाही. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात सध्या ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

खासगीकरण टाळले

राज्याच्या आरोग्य विभागाने ऑनलाइनसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करताना हे काम खासगी संस्थेला देणे टाळले आहे. यापूर्वीचा खासगीकरणाचा अनुभव चांगला नसल्याने त्यांनी सावध पावले उचलली आहेत.

सध्या येथील शासकीय रुग्णालयात ऑनलाइन प्रणालीसाठी सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सॉफ्टवेअरमार्फत लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होईल. डाॅ. रूपेश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, मिरज शासकीय रुग्णालय, मिरज

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra hospitals reinstate online systems, ending manual reports and mobile X-rays.

Web Summary : Maharashtra's government hospitals are re-establishing online systems after a four-year disruption. This ends manual reports and mobile X-rays. A dedicated software will be implemented, streamlining processes and reducing queues, with training underway for staff.