शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य वितरणात काळाबाजार माजला

By admin | Updated: February 1, 2015 02:13 IST

काळाबाजार आहे, अशी कबुली देत तो थांबविण्यासाठी बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली़

अहमदनगर : अन्नधान्य वितरणात मोठ्या प्रमाणात काळाबाजार आहे, अशी कबुली देत तो थांबविण्यासाठी बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली़अहमदनगर येथे शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी बापट आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात चार ठिकाणी सध्या बायोमेट्रीक प्रणाली प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे़ लवकरच सर्वत्र ही प्रणाली राबविण्यात येईल.सध्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना धान्य पुरवठा होत आहे़ मात्र, काँगे्रस सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दारिद्य्ररेषेवरील लोकांनाही अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला होता़ राज्य सरकारने केंद्र सरकारकडील निधीची शहानिशा न करताच निर्णय घेतला़ त्यामुळे त्याची अंमलबजावणी करायची असल्यास राज्य सरकारवर १,५०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे़ हा निर्णय राबविताना गरजू नागरिकांचा शोध घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे़ अन्नधान्य वितरण करताना सर्व लाभधारकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याबाबत सरकारचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.शिरुर (जि़ पुणे) तालुक्यात बायोमेट्रीक प्रणालीचा प्रयोग करण्यात आला होता़ त्यामध्ये ३ वर्षांपासून अनेक नागरिक अहमदनगरला राहत असूनही धान्य वितरण होत असल्याचे निदर्शनास आले़ मग हे धान्य गेले कोठे, असा सवालही त्यांनी केला़ (प्रतिनिधी)रॉकेलचा कोटा वाढविलारॉकेलचा कोटा गॅसच्या संख्येवर ठरत असून, आता गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ गॅसधारकांना सवलतीचे रॉकेल दिले जात नाही़ त्यामुळे रॉकेल कोटा कमी होत आहे़ असे असतानाही या महिन्याचा रॉकेलचा कोटा २० टक्क्यांनी वाढविल्याचे त्यांनी सांगितले.गुटखा विक्रीअजामीनपात्र गुन्हागुटखा विक्री करताना अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकांनी पकडल्यास केवळ दंडात्मक कारवाई केली जाते़ त्यामुळे विक्रेत्यांचे फावते़ मात्र, आता सरकारने याबाबत गंभीर पावले उचलली असून, लवकरच कायद्यात बदल करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे़ तसेच जप्त केलेल्या मालाला पाय फुटतात़ त्यासाठी गोडावून बांधण्यात येणार असून, मालाची विल्हेवाट लावताना पंचांसमक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे़ अन्न निरीक्षकांना तीन महिन्यांत वाहने पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले़