शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात जाहीर होणार भाजपाच्या ३ याद्या

By admin | Updated: January 25, 2017 21:51 IST

आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होणार आहे

आठवडाभरात जाहीर होणार भाजपाच्या ३ याद्या
उमेदवारांमध्ये धाकधूक : काही प्रभागांतील नावांबाबत चर्चा सुरूच
 
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होणार आहे. सर्व प्रभागातील उमेदवारांची नावे एकदम जाहीर न करता २ ते ३ याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. पहिली यादी रविवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुलाखत व सर्वेक्षणाच्या परीक्षेचा निकालच जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढीस लागली आहे.
भाजपाकडे ३ हजारांहून अधिक इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज आले होते. यात प्रस्थापित नगरसेवकांसोबतच, पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. ६ ते १४ जानेवारी या कालावधीत एकूण ३ हजार ३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींच्या ‘पॅनल’मध्ये विद्यमान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदार, शहर पदाधिकारी यांचा समावेश होता.
मुलाखती झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होते याकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये विविध कयास लावण्यात येत आहेत. शिवाय विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला महत्त्व देण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रस्थापित नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत निवडणूक संचालन समितीच्या पदाधिकाºयांची ‘मॅरेथॉन’ चर्चा झाली. बहुतांश प्रभागातील उमेदवारांची यादे अंतिम झाली आहेत. मात्र काही प्रभागांमध्ये समितीने ३ ते ४ नावे वेगळी काढली आहेत. या नावासंदर्भात विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. 
२ तारखेपर्यंत आम्ही सर्व उमेदवारांची नावे घोषित करु. एकत्र नावे घोषित न करता २ ते ३ याद्या जाहीर करण्यात येतील. वरिष्ठ पातळीवर नावांबाबत चर्चा झालीच आहे. त्यामुळे फारसा संभ्रम नाहीच, असे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी स्पष्ट केले.
रासपबाबत अद्याप ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भाजपाकडे युतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहरातील १२ जागा ‘रासप’साठी सोडण्याचा प्रस्ताव ‘रासप’ने ठेवला आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सद्यस्थितीत भाजपाने रासपसंदर्भात ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भुमिका घेतलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रासप’साठी इतक्या जागा सोडणे भाजपाला शक्य होणार नाही. त्यामुळे ‘रासप’ कमी जागांवर लढण्यास तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.