शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पदाधिकारी करिष्मा पुनमियांना अटक

By admin | Updated: February 12, 2015 05:47 IST

जास्त पैशांचे आमिष दाखवून शेकडो महिलांना कोट्यवधींना फसविल्याप्रकरणी भाजपाची महिला युवा प्रदेश उपाध्यक्ष करिष्मा पुनमियाला अटक करण्यात आली आहे.

भार्इंदर : जास्त पैशांचे आमिष दाखवून शेकडो महिलांना कोट्यवधींना फसविल्याप्रकरणी भाजपाची महिला युवा प्रदेश उपाध्यक्ष करिष्मा पुनमियाला अटक करण्यात आली आहे. गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या तक्रारीवरून भार्इंदर पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली.पुनमियाने भार्इंदर येथील मॅक्सस मॉल परिसरातील कृष्णकुंज इमारतीमध्ये ‘गोल्ड किटी पार्टी’ नावाचे कार्यालय सुरू केले होते. त्यात ‘सेव्हिंग अ‍ॅण्ड लॉट्स आॅफ फन’ नावाची गुंतवणूक योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये महिलांनी प्रत्येक महिन्याला १ हजार रुपयांप्रमाणे ३ वर्षांकरिता गुंतवणूक केल्यास त्यांना मुदतीनंतर ४१ हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार, काही महिलांचे ग्रुप तयार करून प्रत्येक ग्रुपमध्ये सुमारे ५०० महिलांना सदस्यत्व देण्यात आले. सदस्य महिलांसाठी प्रत्येक महिन्याला किटी पार्टीचे आयोजन केले जात होते. त्यात भाग्यवान गुंतवणूकदार महिलांना ३६ हजार रुपये दिले जाऊन पुढील मुदतीपर्यंत कोणतीही रक्कम जमा करणे बंधनकारक करण्यात येत नव्हते. हजारो महिलांनी पुनमियाने सुरू केलेल्या योजनेत गुंतवणूक केली होती. परंतु, ज्या महिलांना पुनमियाने चेक दिले, ते बाऊन्स झाले तर काही भाग्यवान तसेच मुदत संपलेल्या सदस्यांना ठरलेल्या रकमा देण्यात आल्या नाहीत. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक महिलांनी मंगळवारी भार्इंदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पुनमियाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि अटक केली. (प्रतिनिधी)