“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:49 PM2021-08-29T19:49:23+5:302021-08-29T19:54:40+5:30

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवले असून, आता राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येण्या सुरुवात झाली आहे.

bjp nitesh rane react on ed summons anil parab in money laundering | “आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

Next
ठळक मुद्देआता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जाईडीकडून अनिल परब यांना काही प्रेमपत्र येणार नव्हतेनितेश राणे यांची टीका

सिंधुदुर्ग: राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना १०० कोटींच्या कथित वसुलीसंदर्भात ईडीने समन्स पाठवले आहे. मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले असून, ईडी कार्यालयात मंगळवारी उपस्थित राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहे. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येण्या सुरुवात झाली असून, भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आता पळपुटेपणा करू नका. आपली बाजू स्वच्छ असेल, कारवाईला घाबरण्याचे कारण नाही, असा टोला लगावला आहे. (bjp nitesh rane react on ed summons anil parab in money laundering)

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत अनिल परब यांच्या सक्तवसुली संचालनालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, नितेश राणे यांनी टीका केली आहे. अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता, असे म्हटले आहे. 

“भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत”; जयंत पाटील यांचा दावा

ईडीसमोर जाऊन स्वत:ला निर्दोष सिद्ध करावे

अनिल परब यांच्या परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्र येणार नव्हते. नोटीसच येणार होती. आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना काय वाटायचे ते वाटू दे. अनिल परब काही एकट्यासाठी पैसे जमा करायचे नाहीत. ते मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत. थोडे परिवाराला द्यायचे आणि थोडे स्वत:ला ठेवयाचे हेच त्यांनी केले. त्यामुळे संजय राऊतांना काय बोलायचे ते बोलू द्या. अनिल परबांनी काय केले नसेल तर राऊतांना तमाशा करायची गरज नाही. त्यांना जाऊ द्या ना ईडीकडे. निर्दोष असतील तर काय घाबरायचे, अशी विचारणाही नितेश राणे यांनी केली आहे. 

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

दरम्यान, शाब्बास! जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू.. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. 
 

Web Title: bjp nitesh rane react on ed summons anil parab in money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.