“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:04 PM2021-08-29T19:04:56+5:302021-08-29T19:05:51+5:30

एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे.

after ed seized property eknath khadse warns bjp that will play cd soon | “योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

googlenewsNext

जळगाव: पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली. यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे. (after ed seized property eknath khadse warns bjp that will play cd soon)

एकनाथ खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणताना ईडीने खडसे यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, बँकेतील ८६ लाखांच्या ठेवीसुद्धा गोठविल्या आहेत, अशी माहिती मिळते आहे.

“भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत”; जयंत पाटील यांचा दावा

योग्य वेळ आली की सीडी लावणार

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली असून, योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा भाजपला दिला आहे. ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो, हे खरे आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच हा अहवाल जाहीर करणार आहे. ईडी  चौकशीवर परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ५० वर्षापूर्वी आपल्याकडे ६० एकर जमीन वडिलोपार्जित आहे. ४० वर्षात आपण इतकी  विकास कामे केली आहेत की आपल्या पासंगालाही कुणी पुरणार नाही, असे खडसे म्हणाले. 

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यात येईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले. खडसेंवर असलेल्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचा जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. याचा बाजारभाव ३१ कोटी असताना गिरीश याने तो अवघ्या तीन कोटींना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा झाला? गिरीश याने तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? याबाबत ‘ईडी’ चा तपास सुरू आहे. 
 

Web Title: after ed seized property eknath khadse warns bjp that will play cd soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.