शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या कार्यकाळात मराठा समाज संभ्रमात, आरक्षणावर श्वेतपत्रिका काढावी: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:22 IST

राज्यातील मराठा समाज अस्वस्थ आहे. पण राज्यपालांच्या अभिभाषणात यासंदर्भात साधा उल्लेखही नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची काय स्थिती आहे, याप्रकरणी  राज्य सरकारने अधिवेशनाच्या काळात, ८ मार्च पूर्वीच श्वेतपत्रिका काढावी, अशी आग्रही मागणी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली.

ठळक मुद्देराज्यपालांच्या अभिभाषणात मराठा आरक्षणासंदर्भात साधा उल्लेख नाहीठाकरे सरकारच्या काळात मराठा समाज संभ्रमातमराठा आरक्षणासंदर्भातील सत्यस्थिती जनतेसमोर आली पाहिजे - पाटील

मुंबई : राज्यातील मराठा समाज अस्वस्थ आहे. पण राज्यपालांच्या अभिभाषणात यासंदर्भात साधा उल्लेखही नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची काय स्थिती आहे, याप्रकरणी  राज्य सरकारने अधिवेशनाच्या काळात, ८ मार्च पूर्वीच श्वेतपत्रिका काढावी, अशी आग्रही मागणी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. (bjp leader chandrakant patil demands white paper on maratha reservation)

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सरकारच्या काळात मराठा समाज संभ्रमात आहे. या सरकामधील काही मंत्री ओबीसी समाजाला असुरक्षित भासविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर या सरकारने नेमके काय केले, याची सत्यस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करावा: उदयनराजेंची मागणी

वकिलांमध्ये समन्वय होता का? सोमवार, ०८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. त्यानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालय देणार आहे. परंतु या विषयी सरकार काय करत आहे? सर्वोच्च न्यायालयात आता पर्यंत किती सुनावण्या झाल्या? किती तारखा झाल्या? यावेळी कोणत्या वकिलांनी सरकारची बाजू मांडली? वकिलांमध्ये समन्वय होता का? मुंबईतून कोणी मंत्री अथवा अँडव्होकेट जनरल दिल्लीमध्ये सुनावणीसाठी जात होते का? या सर्व विषयांची माहिती असणारी श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. 

राज्य सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव

मराठा आरक्षण राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. असे असतानाही त्याची अंमलबजावणी करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, राज्य सरकारकडे एकूणच इच्छाशक्तीचा अभाव आहे. मराठा आरक्षणाबाबत आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागेल, असे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांनी अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकार