शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 14, 2014 09:41 IST

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारे भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारे भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. भाजपाने आवाज वाढवून ठराव जिंकला असला तरी त्यांचे नैतिकतेचे सोवळे सुटल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला मनोरुग्णालयात नेण्याची वेळ राष्ट्रवादीमुळेच आली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये शरद पवारांच्या फुल पॅण्टची हाफ चड्डी झाली आणि भाजपाच्या डोक्यावरही चांद - ता-यांची टोपी आली असा सणसणीत टोलाही त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाला लगावला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत जे झाले त्याचा राज्यभरात धिक्कार होत असून संस्था किंवा त्याच्या पद्धतीपासून दूर गेल्यास जनताच धडा शिकवेल असा इशाराच त्यांनी भाजपाला दिला आहे. 

राज्यपालांना दुखापत झाल्याचे भाजपाने म्हटले असले तरी राज्यपाल चालत विधीभवनात आले व तिथे जोरदार भाषण ठोकले. पण भाजपाने खोटा 'पुरावा' देऊन काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन केले असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला.