शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील कारखान्यांचे प्रदूषण नियंत्रित करणारा बायो कल्चर प्लांट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:51 IST

डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रीत करण्यासाठी बायो कल्चर प्लांट आजपासून सुरु करण्यात आला आहे.

कल्याण:डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रीत करण्यासाठी बायो कल्चर प्लांट आजपासून सुरु करण्यात आला आहे. बायोनेस्ट प्रक्रिया तत्वार आधारीत हा प्लांट आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे असा दावा कामा या कारखानदारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

या प्लांटची सुरुवात कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी यश फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन पटेल, उपाध्यक्ष यश पटेल, नरेंद्र पटेल, उदय वालावलकर, नारायण टेकाडे, राजू बेल्लोरे, कमल कपूर, चांगदेव कदम, मुरली अय्यर, राहूल कासलीवाल, निखील धूत आदी उपस्थित होते.

हा प्रकल्प बायोनेस्ट सिस्टीम या कंपनीचा आहे. सध्या या प्रकल्पाची क्षमता दहा हजार लिटर इतकी आहे. प्लांटचे तीन टाक्यात वर्गीकरण करण्यात आले आहे. कारखान्यातून आलेले रासायनिक सांडपाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील एका उंचावरील टाकीत सोडण्यात येते. खाली बसविलेल्या तीन टाक्यात ठिबक  सिंचन पद्धतीने हे पाणी सोडल्यावर टाकीत लावलेल्या झाडांमुळे रासायनिक सांडपाण्यातील कार्बनडाय ऑक्साईड कमी होऊन पाणी स्वच्छ होते. या प्लांटच्या उभारणीकरीता १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पातील गुंतवणूक ही वन टाईम आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर अन्य १५० कंपन्यांमध्ये हा बायो कल्चरचा प्रयोग केला जाणार असल्याचे सोनी यांनी सांगितले.

प्लांटमधील दहा चौरस मीटरच्या टाक्यात पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. या प्रक्रियेत सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे रसायन आणि रंग देखील फस्त करतात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. या प्लांटमध्ये सांडपाण्यातील रसायनावर जगणाऱ्या सुक्ष्मजीवांचा वापर करण्यात आला आहे. ही प्रक्रियाच संपूर्णपणो नैसर्गिक आहे. या प्लांटमध्ये कोणत्याही महागडय़ा खर्चिक मशीनरीचा वापर केलेला नाही. कमी खर्चात अधिक परिमाणकारक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेची तांत्रिक बाजू औरंगाबादच्या यश फाऊंडेशनने उपलब्ध करुन दिली आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली